Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

चूक..

Share

चूक..
तुझ्या चाहुलीन
नेहमीच उड़णारी माझी धांदल
तू पहिली नसशील??

तुझ्या दर्शनान
माझ्या झुकलेल्या पापण्या नि
आरक्त गाल
तुला निरोप देताना
डोळ्याच्या काठाशी
ओथंबलेले अश्रू
तू पाहिले नसशील??
(कस शक्य आहे?)
तरीही हे अस का??

कदाचित आपण दोघेही चुकलो असू.
मी स्वत:ला व्यक्त करायला,
किंवा
तू माला समजून घ्यायला..

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top