Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

आभास... !

Share

तू इथेच कुठेतरी आहेस..? की हा तुझा भास आहे...?
वार्‍याची झुळुक होऊन येणारा.. हा तुझा स्पर्श आहे? की रातराणीचा सुवास आहे...?
भोवती फेर धरुन.. आजकाल.. तु नुसती नाचत असतेस...
गिरक्या घेत.. वाकुल्या दाखवत..माझी होणारी धांदल बघत असतेस..
पुस्तक उघड्ल्यावर.. आताशा तुझा चेहराच दिसायला लागतो..
हार्मोनियम उघडुन.. मग मी.. तुझी फर्माइशी गाणीच गायला लागतो..
रस्त्यावरुन जाताना.. वळणा वळणाला.. आठवणी दिसायला लागतात..
सिग्नल संपूनही रस्त्यात तसेच थांबल्याने.. मग मागच्या लोकांच्या .. शिव्या खायला लागतात...
निळ्याशार आकाशात.. चंद्राकडे पहाताना..
मन तुझ्याकडे धावायला लागतं...
तू देखील.. त्याच्याकडे.. त्याच वेळी पहात आहेस..
असं सांगुन त्याला आवरावं लागतं.....
शांत वाटावं म्हणुन देवळात जावं... तर तिथेही तू पाठ सोडत नाहिस
ध्यानाला बसावं.. तर.. नजरे समोरुन हलत नाहिस..
देहभान हरपुन.. मी गात असताना.. हळुच निरखुन बघत असतेस..
गाडीत बसायला यावं.. तर आधिच शेजारी वाट पहात असतेस..
हिरव्या श्रावणात.. रंगलेल्या मेंदिसारख्या.. आठवणी रंगधुंद झाल्यात..
आकाशातल्या चांदण्या होऊन.. तुझ्या जाळीदार ओढणीवर पसरल्यात..
जिकडे- तिकडे.. भास- आभास आणि आठव- सावल्यांचेच खेळ....
स्वप्न आणि वास्तवाचा .. आता घालताच येत नाही मेळ...
वेडं मन.... तरीही.. खुणावतचं असतं...
हा भास नाही.... तू इथेच कुठेतरी आहेस...!

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top