Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

नव्हते कोणीच ऐकायला...

Share

गात होतो मी त्या उंच टेकडीवर
नव्हते दूर वर कोणीच
होतो एकटाच मी आणि वारा
पण नव्हते कोणीच ऐकायला....

गात होतो मी त्या घनदाट जंगलात
भरपूर होते प्राणी , पक्षी
भाषा नव्हती समजत त्यांना
म्हणुन कोणीच नव्हते ऐकायला....

गात होतो मी त्या वाहत्या नदीवर
खळ-खळत होते पाणी
पाहत होतो मी दगड - गोटे
तेव्हा कोणीच नव्हते ऐकायला....

गाऊन गाऊन मी तर पार थकलो
मात्र शेवटी आता थाम्बलो
का गाऊ? कुणासाठी गाऊ?
कारण नव्हते कोणीच ऐकायला....

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top