Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

तू जवळ असलास ....

Share

तू जवळ असलास ....
तू जवळ असलास कि मन कस मोहरून जात
निर्मल्मनि झरयाच पाणि हि आपल्या आवाजात बोलू लागत
झूल झुलत्या पाण्यात हि तुझ प्रतिबिंब प्रतीत होत
र्हिद्याच्या कप्प्यात तुझच अस्तित्व मजबूत होत जात ...

मनीच्या निळ्या आकाशात भरारी फक्त तूच मारतोस
र्हिद्याच्या निसर्गात इंद्रधनुष्य जसा तूच सजतोस
दृष्टीच्या पटलावर दूर पर्यंत तूच दिसतोस
र्हिद्याच्या कप्प्यात तुझच अस्तित्व मजबूत होत जात ...

मनातल्या गुलमोहराला बहर कसा तुझ्यानेच येतो
कुंकवाच्या टिपाला लाल रंग तुझ्यानेच भासतो
अंतर्मनिच्या हिरवलिवर राज्य फक्त तुझच असत
र्हिद्याच्या कप्प्यात तुझच अस्तित्व मजबूत होत जात ...

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top