Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

मनाची दौड़

Share

मला ही अस वाटत बसाव एकदा कानात कापसाचे गोले घालून
विसराव जगाला डोळे उघडे ठेउन,
आणि बघावी स्वप्न खुल्या डोळ्यांनी.

मला ही अस वाटत, घालावी शिळ एका सुंदर पुरुषाला पाहून
पड़ाव त्याच्या प्रेमात सारया जगाला विसरून
उतराव त्याच्या अंतरमनी त्या शि लगट करून.

मला ही अस वाटत , कराव impress आपल्या सख्याला
त्यावर line मारनारया स्त्रियांशी भांडून
दाखवावी आपुली ही वट त्यान पेक्षा श्रेष्ठ म्हणुन.

मला ही अस वाटत, घ्याव आपल्या सख्याला घट्ट मिठीत ओढून
करावा चुम्बनांचा वर्षाव चक्क बेशरम होउन
आणि लाजाव त्याने पुरुष असून ही एखादी स्त्रि होउन.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top