Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

मन..

Share

मन आभाळ आभाळ.. मन पाऊस पाऊस...
मन आभास आभास.. मन सुवास सुवास..

मन चांदवा चांदवा.. नभी चांदण्यांचा थवा..
मन पाखरु पाखरु.. मन पारवा पारवा..

मन वेल्हाळ वेल्हाळ.. मन कल्लोळ कल्लोळ...
मन तुफ़ान.. उधाण.. मन पान सळसळ..

मन अथांग सागर.. मन निळेनिळे पाणी...
मन आठवांचे मोती.. मन विरहाची गाणी..

मन हवंस हवंस... मन नकोसं नकोसं...
मन चांदणी पुनव.. विना चंद्राची आवस...

मन कधी ऐलतीर.. मन कधी पैलतीर..
मन होउन नावाडी.. तुला भेटण्या अधीर..

मन काहुर..प्रतिक्षा.. मन कासाविस आशा..
वाट पाहुन पाहुन... मन विरह.. निराशा..
वाट पाहुन पाहुन... मन... विरह.. निराशा..!

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top