पुन्हा घायाळ होण्यासाठी.......
तुझी प्रत्येक 'अदा' घाव करते, मला घायाळ करण्यासाठी....
तरीही माझी प्रिती सिध्द होते, पुन्हा घायाळ होण्यासाठी....
प्रकाशाच्या प्रत्येक किरणात, मला तुझं अस्तित्व जाणवतं;
अंधाराला मी टाळत राहतो, तुझाच सहवास घडण्यासाठी....
निळ्या नभाचा निलीमा मला, तुझ्या डोळ्यांसमोर फिका भासतो;
मेघांना मी दूर सारतो, तुझ्या नजरेत बुडण्यासाठी....
खळखळत वाहणारे पाणी, तुझ्या हास्याची आठवण करुन देतं;
नदीतटाशी मी बसून राहतो, तुझा मोहक आवाज स्मरण्यासाठी....
तू जवळ असतेस तेव्हा, चैतन्याला उधाण येतं;
मोरपिसं मी वहीत सांभाळतो, तुझा रेशमी स्पर्श जपण्यासाठी....
स्वप्नांमध्ये माझ्या आता, तुझा नेहमीच वावर असतो;
तरीही मी रात्र-रात्रभर जागतो, तुझ्यावर कविता लिहीण्यासाठी....
वाटते मला, कळावे तुलाही, गूज मनी या लपलेले;
पण भावनेला माझ्या शब्द पुरत नाहीत, माझं प्रेम व्यक्त करण्यासाठी....
गुरुवार, ४ जून, २००९
पुन्हा घायाळ होण्यासाठी.......
५:१४:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा