Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

आई.... ऐकतेयस ना ग

Share

आई.... ऐकतेयस ना ग
आज एक विनंती करतोय तुला...
नाही यायचय मला ह्या जगात....
मला इथेच राहू देत ना ग..... तुझ्यातच.....तुझाच एक अंश होउन कायम....

तुझ्या गर्भातील उब मला ह्या जगात कुठेतरी मिळेल का ग?
माझ्या ह्रुदयाचे ठोके तुझ्या इतके कुणीतरी ऐकू शकेल का ग?
नाही यायचय मला ह्या जगात....
मला इथेच राहू देत ना ग..... तुझ्यातच.....तुझाच एक अंश होउन कायम....

तुझ्या गर्भात मला स्वर्ग दिसतो
बाहेरही असच जग असत का ग?
सुंदर, छान, सुरक्षित तुझ्या गर्भाइतके
नाही यायचय मला ह्या जगात....
मला इथेच राहू देत ना ग..... तुझ्यातच.....तुझाच एक अंश होउन कायम....

माझी भूक तुला न सांगता कळते
माझ्या हृदयाची स्पंदन तू अचूक ओळखतेस
अस ह्या जगात तुझ्या शिवाय कुणी आहे का ग?
नाही यायचय मला ह्या जगात....
मला इथेच राहू देत ना ग..... तुझ्यातच.....तुझाच एक अंश होउन कायम....

खरखोट, वाईटचांगल, चूकबरोबर मला काही माहिती नाही
तुझ्या गर्भात खोट ही खर, वाईट ही चांगल आणि चुक सुद्धा बरोबर वाटत ग
इथे वाईटाचा गंध ही नाही आहे ग
हे अस बाहेरही असेल का ग?
नाही यायचय मला ह्या जगात....
मला इथेच राहू देत ना ग..... तुझ्यातच.....तुझाच एक अंश होउन कायम....

तुझ्याइतक प्रेम कुणी करेल का ग मला?
यश अपयश नाही पहायचय मला
पैशांचे बंगले नाही बांधायचेत मला
स्वतःच अस्तित्व नाही बनवायचय मला
नाही यायचय मला ह्या जगात....
मला इथेच राहू देत ना ग..... तुझ्यातच.....तुझाच एक अंश होउन कायम....

आई.... ऐकतेयस ना ग
माझा आवाज तूच ऐकू शकशील
माझ्या भावना तूच समजू शकशील
सगळी नाती फार खोटी दुरची वाटतात ग
एक तूच खरी आणि जवळची वाटतेस....
मी तुझ्या गर्भात खुप खुप आनंदी आहे सुखी आहे, तृप्त आहे ग
म्हणुनच म्हणतो.....
नाही यायचय मला ह्या जगात....
मला इथेच राहू देत ना ग..... तुझ्यातच.....तुझाच एक अंश होउन कायम....

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top