Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

जुनी वाट..

Share

जुनी वाट..

उंच उंच झेपावण्याची, ना हाव माझी थांबते
सारखे खुणावते अवकाश मज अथांग ते
आज आली याद पुन्हा ओल्या स्मृतींची, परतलो
खुप आला दूर् आता ,वाट माझी सांगते
उंच उंच झेपावण्याची,ही हाव तरी ना थांबते..

भिंतीत येथे माणसांच्या, नाना चरे दिसती मला
गर्दीत आणि चेहऱ्यांच्या, चेहरे दिसती मला
अन् जुन्या वाटेवरी,जी भेटली मज माणसे
तोतयांच्या दुनियेत केवळ ते खरे दिसती मला...

आता जुन्या वाटासुध्दा मज सांगती आहे पुन्हा
ये परतूनी ये पाखरा, मी वाट आहे पाहते
अन् तरी झेपावण्याची ना हाव माझी थांबते..
खुप आला दूर् आता ,वाट माझी सांगते...
..................ही वाट माझी सांगते.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top