Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

एक तू आणि एक मी

Share

एक तू आणि एक मी

एक क्षण तुझा
एक क्षण माझा
आणि एक सुंदर सहवास आपल्या दोघांचा

एक हसू तुझ
एक हसू माझ
आणि मोत्यांची बरसात आपल्या दोघांच्या हास्याची

एक हाथ तुझा
एक हाथ माझा
आणि एक शेवटपर्यंत निरपेक्ष साथ दोन जीवांची

एक श्वास तुझा
एक श्वास माझा
आणि एकरूप झालेली स्पंदन आपल्या दोन हृदयांची

एक अश्रु तुझा
एक अश्रु माझा
आणि अश्रुंनी भरलेली ओंजल आपल्या दोन हातांची

एक प्रश्न तुझा
एक प्रश्न माझा
आणि उत्तरासाठी थांबलेले आपण दोघहि

एक वाट तुझी
एक वाट माझी
आणि एकत्र प्रवास दोघांचाही

एक आयुष्य तुझ
एक आयुष्य माझ
आणि आनंदाची उधलन दोघांचीही

एक प्रेम तुझ
एक प्रेम माझ
आणि एकमेकांच्या प्रेमात रंगलेले आपण दोघही

तुझी अणि माझी बेरीज केली
तुझी अणि माझी वजाबाकी केली
गुणाकार, भागाकार सुद्धा करून पहिला
आणि शेवटी जे उत्तर आल ते होत
फक्त अणि फक्त आपल
आपल्या दोघांच.....

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top