Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

अंतरीच्या ह्या व्यथांना समजुनी घे

Share

अंतरीच्या ह्या व्यथांना समजुनी घे
आसवे का ढाळली मी ? समजुनी घे

प्रत्येकवेळी दोष देता अर्जुनाला !
बाण त्याने मारिला का ? समजुनी घे

चांदण्यांचे भास मजला होत होते
सूर्य का मी टाळलेला ? समजुनी घे

शब्द का भिजतात माझे वाचतांना
अश्रु का ओथंबलेले ? समजुनी घे

काफिये बनतात काहीसे शहाणे
आशयाचा रंग वेडा समजुनी घे

राममंदीर बांधणारे थोर झाले !!
दंगली का पेटल्या ते .. समजुनी घे

ईश्वरा .. तुज सांगतो मी आज सारे
आरतीला रांग का ते .. समजुनी घे

मी अताशा प्रेमवेडे लिहीत नाही
का विरक्ती मागतो मी ? समजुनी घे

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top