Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

तेजोवलय

Share


कधीच जाणवले नाही
अंतर कसे ते संपले
भर चन्दण्या रात्रीला
रणरणते उन्ह भासले ||

भासात संपले जगणे
काळाची जीवघेणी चाहूल
वाट सरली जिथे
अडखळले माझे पाउल ||

मध्यानरातीची जाग
आणते शरीरी काटा
उघड्या डोळ्यांवर येती
भयाण अंधारलाटा ||

मनात ठेवुनी विस्तव
रात्रीचा शोषतो गारवा
घेण्या ठाव घरट्याचा
एकटाच उडतो पारवा ||

वासनांचा झाला चिखल
आकांक्षा गेल्या विरून
मीच न्याहाळतो कलेवर
नजरेत आशा भरून ||

काळ समीप ठाकला
प्रकाश भरले हृदय
मिट्ट भरल्या काळोखात
दिसू लागले तेजोवलय ||

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top