रात्रीचा एक कोपरा
पौर्णिमप्रकाशात भिजलेला
तुझ्या माझ्या मिलनासाठी
चांदण्याचा पडदा विणलेला ||
ये अशी मिठीत सजणे
प्रत्येक चांदण्याचे झुंबर व्हावे
तुझ्या खोल नजरेत मला
हरविलेले तारे गावसावे ||
चांदरस रात्रीवर कोसळावा
त्या आवेगाने शिर आलिंगनात
तुझ्या तनुचे करूनी कारंजे
हळूच ओघळुनी जा माझ्या शरीरात ||
होऊ दे मंद रात्रीस
विझु दे प्रत्येक तार्यास
आपूल्या मिलनाची चाहूल
लागू दे सार्या आसमंतास ||
तारा तारा तुला बिलगावा
प्रत्येक तारा मी ओठानी उचलावा
आपूल्या प्रणय उत्सवाचा
प्रकाशमयी सोहळा व्हावा ||
रात्र शरमुन लालसर व्हावी
पूर्वेस लाजेचा रक्तीमा पसरावा
उगवत्या सूर्यास ही तेव्हा
नभी तळपल्याचा पश्चाताप व्हावा ||
शुक्रवार, २९ मे, २००९
रात्रीचा एक कोपरा
४:५३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , रात्र , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , रात्र , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा