Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

उधळलेल्या प्रतिमा

Share


तीव्र कठिण काळ हा आला
तमा कुणाची कशास बाळगावी
तडा गेलेल्या आरश्यातुनी सारी
विखुरलेली एकच प्रतीमा वेचावी ॥

सारेच करीती अटकाव नशेस
दुसरया चषकात मदिरा कुणी भरावी ?
एकट्या पडल्या स्वप्निल गावास
नवी पहाट कुठुनी आणावी ॥

गोठली नात्यांची वीण
माणसे सारी गर्दीस मिसळली
एकेक करुनी पांगले सारे
पत्त्यांची शहानिशा कुठे करावी ?

अर्थाच्या स्वार्थात बुडालेत सारे
जपल्या नात्याची जाण कुणास व्हावी
डोळा पट्टी बांधल्या गांधारीस
भविष्याची चुणुक कुणी दाखवावी ॥

आवेगाने सारेच थिजलेले
गर्दित ह्या ओल कुठे शोधावी
वाटेवरी पसरल्या मोगरकळ्या
कुणी कुंतली वेणी बांधावी ॥

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top