Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

गुिपत

Share

लोखंडास आलिंगन दे तु
भाव कोवळे मेले ह्र्दयात
कुणासाठी उघडतोस हि काया
उरला क तुझ्यात पुरुषार्थ?

माडीवरल्या लावण्यासही तु
पुरुषर्थाचे केलेस भक्श्य
फ़ुका का वळवळतोस किडयासम ?
पुरुषार्थाची शिकार हेच त्यांचे लक्श्य ।

व्रुथा फ़सवुनी नाहक शरीराला
का शोधी तु वाट अनामिक ?
जाग शरीरी दडल्या भावास
का ओलांडितोस पट रात्रीचे नाहक ?

रात्रीचे रात्रीस गुढ मिसळणे
धरु नकोस काळ काजळी हातात
काटयावरती पडल्या फ़ुलास सांग
काय गुपित दडविलेस तु मनात ।

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top