जगूनी थकलो आता
घे पदरात मला
सार्यानीच आव्हेरले,
माझ्या अंतरीचे पीळ
माय जाणवतील तुला !
खूप केली भटकंती
गात्र थकले गे माये
राहिली ना सावली,
तुझ्या कष्टाचे दूध
माझ्या शरीरी गे प्रवाहे !
किती मी लढणार
सतत दिसती पराभव
उरला ना ठाव,
नजरवारातुनी सावरण्या
नयनाकडा मस्तकी लाव !
कुणी न उरले
आता मज आधारास
एकटेपण झोंबते,
उल्कापाताच्या द्रुष्टान्तातुनी
बळ दे ग माझ्या भासास !
वार्यावरी उधळलेले
पिसासम हे जीवन
पोरकेपण उरलेले,
मातीत गाडलेले
एकदातरी उघड तव नयन !
मी अनाथ एकाकी
घे मला पदरात
धिक्कारती सारे,
आता तरी गे माये
मजसी घे पुनश्च उदरात !
शुक्रवार, २९ मे, २००९
उल्कापाती दृष्टांत
४:०६:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा