Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

भयशिळा

Share

बेताल झाल्या सावल्या
डोंगरी वणवे पेटलेले
चाटती ज्वाळा नभाला
अंगी रक्त गोठलेले ||

मोकाट मनाची पाडसे
वावरती बावरल्या पारधीपरी
पेटलेले डोंगर सारे
ठेवती भयशिळा उरी ||

दूरच्या त्या प्रकाशशलाका
झोंबू लागल्या अंगास
आसुरी पडछायेची भीती
ग्रासू लागली मनास ||

चंद्र झाकाला कृष्णमेघात
स्थिर जाहली धरती
चांदण्या मोजत रात्रीस
एकेक प्रहर सरती ||

पहाटेचे धूसर स्वप्न
गेले दूर क्षितीजापार
निसटत्या संभोगकाळाचा
एकट्या रात्रीस भार ||

अनामिक ती चाहूल
काटा ठेवते शरीरी
देऊनी काळास आव्हान
अंधार करतो शिरजोरी ||

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top