एक अंतहीन झोप
कणाकणाने मारणारी
प्रत्येक संध्याकाळी
व्हिस्कीत भिजणारा घसा
अन्
दिवसभर चालणारा सिगरेटसचा
महायज्ञ,
सगळं सगळं संपविण्यासाठी चाललय,
नरकासम जगणं तरी कसं ?
आंड चेचून घेतल्यावर बैल म्हणून राबावं
लागतं अन् मेल्यावर खाटकाकडे जायचं असतं .
नशेत केलेल्या काही कविता
साल्या बलात्कारीतच असतात
जिच्यावर प्रेम केलं तीलाच
वार्यावर सोडून देण्यातला कमजोरपणा
बलात्कारापेक्षाही भयानक.
नुसतेच रंग फेकून चित्रात
गुढता निर्माण करावी असे
अमूर्त मित्र
अन्
त्यांचा सहवास कधीचा टाळतोय
जगण्यात गुंतागुंत नको म्हणून
तरी सालं
उकिरंडे फुंकणे चुकत नाही.
मग पुन्हा संध्याकाळी
व्हिस्कीच्या लाल रंगात
सिगरेटच्या धुराचे धुवटपण
बुडायला लागते
सहाव्या पेगला मेंदू
तल्लीन होतो
अन् पुन्हा
नवी कविता बाहेर येते
नवी गुंगी घेऊन .........
शुक्रवार, २९ मे, २००९
एक अंतहीन झोप
४:११:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा