विधावेच्या कुंकवासारखा
मी भूतकाळ पुसून टाकलाय
भुतकाळाच्या अघोरी अंधारातून
येणार्या त्या जहरी सार्पान्ची
आता मला शरीरगोठी भीती वाटते
ते मला विळखे घालतात
सारे जहर माझ्या शरीरात
विसर्जित करून मला
नको असलेली निळीशार
स्वप्ने दाखवितात,
मग माझे शरीर माझे राहत नाही
श्वापद शोधणारे जनावर होते
अप्रगत अनादिकाळातील लपलेल्या
सैतानासारखे आहुती मागत
आदिशक्तिचा ग्रास मागते.
शापित असे हे जगणे
अंतिम पापाच्या भरलेल्या
घड्यासारखे
मग असे कित्येक
ओशाळवाणे शाप घेऊन मी
रात्रींचा माग काढतो,
सर्वांगभर जखमा अन्
मनाने अत्रुप्त मी
वैषयीक जिभा वळवळत
रात्रीला चाटत असतो
सारी रात्र निळी करून सारा
काळोख गिळत असतो
मग सारे शरीर
काळे ठिक्कर पडते
आरसा सुध्दा मला ओळख
दाखवत नाही
मग मीच माझी ओळख शोधत
निळी रात्र पुन्हा काळी करायला लागतो.
शुक्रवार, २९ मे, २००९
निळीरात्र काळीरात्र
४:११:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा