मन भरुन आलयं
कधी कोसळेल
ह्याचा नेम नाही,
सावल्या कधीच पांगल्यात,
क्शितीज दाटलेला
काळोख
अस्ताची चाहुल देतोयं
काळोखाच्या भीतीने
आज
चन्द्रसुध्दा उगवणार नाही.
शेवटच्या वसंतबहराचा
वारा
शरीराला गार करत
गळत्या पाकळ्याना
वाहतोयं
फ़ुलांनी त्यागल्या
सुगंधाचे दहन
करतोयं,
उद्या पसरणारया
उन्हाची काहीली
आज मनात
उफ़ाळतेय
शांत होवुन
मी मात्र
शिशिरातल्या पानगळतीला
आठवतोय............
कधी कोसळेल
ह्याचा नेम नाही,
सावल्या कधीच पांगल्यात,
क्शितीज दाटलेला
काळोख
अस्ताची चाहुल देतोयं
काळोखाच्या भीतीने
आज
चन्द्रसुध्दा उगवणार नाही.
शेवटच्या वसंतबहराचा
वारा
शरीराला गार करत
गळत्या पाकळ्याना
वाहतोयं
फ़ुलांनी त्यागल्या
सुगंधाचे दहन
करतोयं,
उद्या पसरणारया
उन्हाची काहीली
आज मनात
उफ़ाळतेय
शांत होवुन
मी मात्र
शिशिरातल्या पानगळतीला
आठवतोय............




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा