माझा हात थरथरतोयं
सारं काही बधीर झालयं,
तेव्हा तुझ्या किंकाळ्यांनी
माझे अघोरी कान
फ़ाटले नाहीत
अन काळीजही वितळले नाही
कारण
शरीरात ढोल वाजत होते
ढोलाच्या शरीरधुंद
तालातुन बाहेर
आल्यावर
आता मला
माझीच किळस वाटतेयं
"त्याच्यासमोर"
confession करतोयं,
पराभुत मनाने
अन
विटाळलेल्या शरीराने
मी "त्याला" शरण
जातोय!
तु मात्र
पाण्याला शरण गेलीस
माझा दाह शांत करुन.....




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा