दु:ख माझे मजपासुनी मला न आले लपवता
अनोळखी आरशात मी डोकवुनी पाहता
ओळखीची मी अनोळखी जाहलेली
अनोळखी आरशात ओळख पटलेली
प्रज्ञ आसवे कधीची डोळ्यात दाटलेली
तृषित वाळवंटातील जशी नदी आटलेली
धगधगती ,धुमसती ही आयुष्याची किनार
वणव्यासम वा-यासवे करीतसे प्रवास स्वैर
बेचिराख सरणांचे हे वाण
म्हणती मला तूझ्या अस्तित्वाचे हे ठिकाण
उमटली अद्वैत हास्याची एक लकेर
जसे उगवते इंद्रधनु क्षितिजावर
शुक्रवार, २९ मे, २००९
ओळख
३:१३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा