Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

ओळख

Share

आगीत जळाली सगळी मुळं
वाटलं
शेवट झाला

झाडावर लटकलेल्या परिपक्व फळाकडे
दुर्लक्ष होतं
आनंदात होते सारे
फळाची उर्मी जागृत झाली
जमिनीत समाधिस्त झालं
मानेला अंकुर फुटला
आगीच्या फुफाट्यासारखा वाढला
नजरा वळल्या जाळणा-यांच्या
लागलेल्या कळ्या तोडण्यासाठी
हात पूढे केले
शुभ्र फुले ओरबाडण्यासाठी
जळाले सारे हात
तेव्हा कळाली
आगीच्या मुळांच्या फुलांची ओळख.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top