मुलींच आयुष्य म्हणजे काच.जपुन ठेवावी लागते.पण होते का असे?
चिंचा बोरी,
वाटेवरल्या चिंचा बोरी,
तशा फाटक्यात भरल्या पोरी.
हातची फुटली पाटी,
चढली डोईवर ’पाटी’
सुटली साथ अ आ इ ई ची,
नकळत झाली आई भावंडांची.
तापला तवा चुलीवर,
चटके लहान्या मनावर !
दिसामाजी दिस सरत गेले.
फाटक्याची थिगळं वाढवत गेले.
कळलच नाही कधी कसं?
वयात मोहरणं असत कसं ?
भरल्या पिंडाला पाहुन,
कावळे जमती फिरुन.
फाटक्यात तरण्या पोरींची दशा,
वाटेवरल्या पिकल्या चिंचा बोरी जशा.
शुक्रवार, २९ मे, २००९
मुलींच आयुष्य म्हणजे काच.जपुन ठेवावी लागते.पण होते का असे?
३:१५:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा