Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

ही सत्यकथा आहे,१९९५-९६ च्या आसपासची जी आजही बेमानी रस्त्यांवर घडतच असेल.

Share

ही सत्यकथा आहे,१९९५-९६ च्या आसपासची जी आजही बेमानी रस्त्यांवर घडतच असेल.

दि एन्ड
रोज तिला मी पहायची.
माझ्याकडे बघुन ती हसायची.
माझ्याच वयाची,
सुंदर साजुकशी,
निर्मळ डोळ्यांची
रुंद भाळाची,
गालावरती खळी,
ओठांवरती लाली.
मला पहाता,
तिचे डोळे व्हायचे जिवंत
बोलायचे,
’माझ्याशी बोल तू निवांत’
असा खेळ रोज चालायचा
रस्ता तो
’रोजचा माझा येण्या-जाण्याचा’

कधी ती दिसायची,
कधी ती हरवायची(?)

तेव्हा काहीच कसं कळल नाही?
तिनेही,
शब्दात काही आणलच नाही.
मी ही होते,माझ्यातच दंग
कळलाच नाही तो प्रसंग

आता खूप उशीर झाला होता .
बोलुन तिच्याशी फायदाच नव्हता.
कारण,शोधल तिला
तेव्हा कळलं
लाल दिव्याखाली,
तिला म्हणे एड्‍स ने गिळलं.

(ही सत्यकथा आहे)

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top