कशाला फुलांचा मला हार घेता
पडक्या वडाचा उगा पार घेता
मोडुन पडली कधीची जवानी
कशाला स्वतःचाच आधार घेता
पुरे जाणतो मी तुझ्या आसवांना
नेत्री तुझ्या नीर आकार घेता ....
कुणाचे जरी खुन करता ईथे
मिरवुन येथेच सत्कार घेता
अशी नीच असते वृत्ती जगाची
जगत्या कवितेसही ठार घेता
अरे सोड चिंता तू "संतोष" येथे ...
गगनातले देव माघार घेता ...




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा