मनात होते
सुरात होते
तुझे बहाणे
उरात होते
उगा मोगरा
खुशीत नव्हता
तुझे बहाणे
फुलात होते
अशी शांतता
नभात असता
तुझे बहाणे
ढगात होते
मनी घेतला
तुझा शोध मी
तुझे बहाणे
वहात होते
आज आरसे
घराघरातील
तुझेच डोळे
पहात होते
सरता सरता
रात म्हणाली
तुझे बहाणे
पहाट होते




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा