उजळलेल्या दिशा
अन दिवाळी पुढे
रात्र माझी परी
काय स्मरुनी रडे
अंगणाशी दिसे, तीच ती केतकी
अन अबोली जशी होत असे बोलकी
स्पर्श होता तुझा
जी कळीही फुले
रात्र माझी परी
काय स्मरुनी रडे
या नभाशी जणू रात झंकारते
अन तुझ्या आठवा बोलूनी दाटते
आसवांचे पुन्हा
मांडते मी सडे
रात्र माझी परी
काय स्मरुनी रडे




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा