Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

तुझे इशारे

Share

कधीच नाही मला कळाले तुझे इशारे
कशास अंगी उधाण झाले तुझे इशारे

कधी कधी तु ढगात होती, मनात होती
नभात आणि सुरात होते तुझे इशारे

वसंत होता तुझ्या घराला सदाच राणी
तरी दुपारी उन्हात होते तुझे इशारे

जरा कविता म्हणुन गेलो तुझ्या पुढे मी
तुझ्या वाहवा मधेच होते, तुझे इशारे

तुझे हासणे नकोच आता कुणास देऊ
अश्या हासण्या मधेच आहे तुझे इशारे

आता जरी मी तुला स्मरावे कबुल नाही
जुन्या आठवांमधेच होते तुझे इशारे

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top