Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

कधी कधी

Share

बोलणे कधी कधी, हासणे कधी कधी
पाहता जरा मला लाजणे कधी कधी

एक स्पर्श जाहला, लाघवी असा तुला
नजर टाळूनी सवे, चालणे कधी कधी

जाणते मनातले, गुज तुही साजणी
का तरी अजाणते, वागणे कधी कधी

का कधी कधी सखे, भासतेस तु अशी
आरश्यातुनी तुला, पाहणे कधी कधी

ठेवले तिथेच मी फुल जे वहीवरी
तेच फुल उचलुनी, माळणे कधी कधी

होऊदे जे व्हायचे, लाजते कशास्तवे
उगाच देत राहते, कारणे कधी कधी

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top