Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

गाणी ...

Share

ोणत्या अर्थास ही छळतात गाणी

कोणत्या शब्दांसवे पळतात गाणी

तु सखे गेलीस ज्या रचुनी चितेला
त्याच आगीशी आता जळतात गाणी

मजला नको ती दाद गावाशी तुझ्या
बहिऱ्यांसही माझी .... कळतात गाणी

आसवांचे आज मजला न्युन नाही
पापण्यांशी सारखी गळतात गाणी

पौर्णिमेचे वेश तु लेउन सजता
चांदण्यांशी आजही मळतात गाणी

दुःख जे असते उराशी पीत जाणे
दुःखासवे अश्रुही गिळतात गाणी ..

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top