Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

एकच तारा ...

Share

हसरे झाले
जरी चांदणे
एकच तारा मनी ठसे ...
नयन उघडतो
कधी झाकतो
एकच तरूणी मला दिसे ...

कधी अवेळी
पाऊस येता
चिंब होऊनी गाई रान
चिंब होऊनी
मीही गाता
शब्दोशब्दी तिच असे ...

तेव्हां गगनी
वीज नभाची
थरथर होऊन बघणारी
अधरांवरची
अशीच थरथर
उगा मनाला लावी पिसे

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top