Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

विश्राम ...

Share

रक्त ओकून शांत होणे, हेच उरले काम आहे
कावळ्यांचे शाप घेऊन, वासरू बदनाम आहे

ह्या स्मशाणातून आता, आरत्या होतात नित्ये
हेच मंदीर जाहलेले, हेच चारी धाम आहे

का सबब देऊन हल्ली सांत्वने होतात येथे
रावणांचे वेश सगळे, शुन्य झाला "राम" आहे

तोकड्या कपड्यांस आता वेशभुषा मानती ते
झाकत्या अंगास आता, चार आणे दाम आहे

मोजतांना चिंधड्या आणि मनाची लक्तरे ही
कोणता आराम आणि कोणते विश्राम आहे ?

हाय रे तुही कधीचा हारलासी रे महात्म्या
जिंकला लादेन आणि, जिंकतो सद्दाम आहे ..

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top