Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

पावसाळी भाव

Share

पावसाळी भाव
पाणावलेले सारे भास
चिंब करुनी जातात
वेडया मनात तेव्हा
हळुच रानपक्शी गातात ।

ओघळती अवखळ झरे
नागमोडी नाचतात
हळुच कडयाशी येवुनी
बेबंद प्रपात वाहतात ।

शरीर लगडले धुके
अंगात उमलती दवफ़ुले
निळे ओलसर भाव
भिजल्या निसर्गात दडले ।

निसरडी वाट ओली
चिरुनी जाते जंगलास
ढगात बुडाले कदंब
आवेगी चुंबती गगनास ।

डोंगरापल्याड पाऊसधारा
धरती झुंबर नभात
किणकिणत्या संगीतरागात
मोर नाचती रानात ।

पावसाळी भाव सारे
उतरती सारया हिरवाईत
चांदिची आरास सजते
प्रकाशित ओल्या पानात ।

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top