Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

हुंकार वेदनेचे

Share

हुंकार वेदनेचे

दशदिशा पेटुनी जाव्या
सूर्याचा अंत व्हावा
वेदनेच्या हुंकारांनी
विनाशी प्रलय उठावा |

गर्भांचे व्हावे सख्खलन
पौरुषास घाम फुटावा
वेदनेच्या हुंकारांनी
विनाशी प्रलय उठावा |

ज्वालामुखी झोत उठावे
उल्कापाती कहर घडावा
वेदनेच्या हुंकारांनी
विनाशी प्रलय उठावा |

अंतरीक्षाचा तोल ढळावा
कृष्णविवरांचा वेढा पडावा
वेदनेच्या हुंकारांनी
विनाशी प्रलय उठावा |

अस्तित्वासही लागावे ग्रहण
विजांचा कल्लोळ व्हावा
वेदनेच्या हुंकारांनी
विनाशी प्रलय उठावा |

कळस व्हावे मातिमोल
ईश्वर निद्राधिन व्हावा
वेदनेच्या हुंकारांनी
विनाशी प्रलय उठावा |

प्रत्यांचेवर बाण असावा
विश्वाचाच मस्य व्हावा
वेदनेच्या हुंकारांनी
विनाशी प्रलय उठावा |

शिवाने करावे तांडव
विश्वाचा अंत व्हावा
वेदनेच्या हुंकारांनी
विनाशी प्रलय उठावा |

इतका विनाश घडावा
कल्कीच प्रगटावा
वेदनेच्या हुंकारांनी
विनाशी प्रलय उठावा |

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top