ही कविता खास करुन पालकांसाठी आहे.
मुलं निरागस असतात त्याना ह्यातल काहीच कळत नाही.म्हणुन मुलांना विष्वासात घेउन त्यांना विचारा आणि सांगा-
१.अनोळखी वाओळकीच्या कोणकडुनही गोळ्या-बिस्किटे घेउ नकोस.जर कोणा ओळकीच्यांकडुन घेतलीच तर आधी घरी येउन सांग.त्यनी का दीली हे सांग
२.कोणी काका,दादा,मामा...तुझ्या विशिष्ठ अंगाना हात लावतो का?हो-नाही.हो असेल तर कोण?
फक्त मुलींनाच नाअही तर मुलांनाही हेच प्रश्न लागु होतात.
कृपया कोणी गैर अर्थ न काढता या जन-जागृतीच्या मोहिमेला साथ द्या.
खारीच्या वाट्यातील मुंगीचा वाटा आपण बनुयात.
निष्पाप
मी पहिली आले,
बाबांनी खूप लाड केले.
मी स-या चाळीत पेढे वाटले.
काकांनी गालगुच्चा घेतला
कॆटबरीचा तुकडा हातावर ठेवला.
परत ये म्हणाले.
अख्खी देतो....
*
*
गालावर गाल घासला
त्यांच्या दाढीचा काटा रुतला
कॆटबरीचा अख्खा बार मिळाला
*
*
*
काकांनी विचारले,
’सुक्यामेव्यात तुला काय आवडते?’
मी,’अं........?’
काका,-’कच्ची मनुका आवडते’
म्हणुन खूप जोरात दाबलं.
ते रूप भयानक वाटल.
पळत जाउन घर गाठलं.
*
*
*
*
रोज मला बोलवतात.
कॆडबरीचं अमिष दाखवता.
मी त्यांच्याकडे जात नाही
ते मला आवडत नाही.
*
*
*
*
*
एकटीच होते घरात.
आई गेली होती बाजारात.
घराच दार होत उघड सताड.
तोच भयानक वास आला.
तोंडापुढे एक हात आला.
पोटात माझ्या खूप दुखल.
नंतर काय घडल,मला नाही कळल.
डोळे उघडले,
दवाखान्याच्या पलंगावर मी झोपलेले.
आईच रडणं,काही केल्या थांबत नव्हतं.
बाबा म्हणत होते,’कार्टीनं नाक कापल होतं’
?
?
"मी अस काय केलं होतं?"
शुक्रवार, २९ मे, २००९
निष्पाप
३:२४:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा