Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

मराठी गोस्टी

Share

संध्याकाळी बाबा आले.
बोलावुन मला म्हणाले,
"साहेबांचा मुलगा आलाय नवीन,
तुझ्याच शाळेत अऎडमिशन घेइन."

*

शाळेचा दिवस पहिला होता.
वर्गात खरच एक मुलगा नवा आला होता.
मी हसलो.
तोही हसला.
मैत्रीचा हात
हातात घेतला.
पांढरपेश्या शाळेत आमच्या ,
रोज नव्या गोष्टी व्हायच्या.
आम्ही त्यातच रमायचो,
खूप हुंदडायचो.
कधी कधी कनावर काही पडायचे.
मग माझे कानही टवकारायचे.
घरी येउन बाबांना विचारायचो,
तो वेगळा आहे का?
बाबा म्हणायचे,
तसा तो तुला वेगळा दिसतो का?
मला कळायचेच नाही.
बाबा प्रश्णाचे उत्तार प्रश्ण का देतात?
उमगायचे नाही.
आईला विचारायचो,
आई म्हणायची,
’नाही रे बाळा तो नाही वेगळा,
तो तुझ्यासारखाच"
मी ही म्हणायचो.
’हो माझ्या सारखाच,
दोन हात ,दोन पाय,
दोन डोळे , दोन कान."
आजोबांना विचारले तर,
चष्मा हातात घेउन विचारात पडायचे....
माझा नियम,
त्यांच्या टकल्यावर टपली मारुन पळायचे.
वाढता वाढता मी वाढत होतो.
सगळे म्हणायचे मी मोठाअ होत होतो.
*
आज शेवटचा निकाल लागला.
मी शाळेत पहिल्या दहात
तर तो शेवटच्या दहात आला.
तरी आमच्यात,
काही फरक नाही पडला.
एकाच कॊलेजच्या प्रवेश रांगेत उभे होतो.
नंबर लागण्याची वाट पहात होतो.
निकाल कळला.
तो पहिल्या पाचात.
तर मी प्रतिक्षा यादीत.
हा पहिला धक्का होता.
वेगळेपणाचा विचार मनात आला होता.
तरी हरलो नाही,
रडलो नाही.
शिकून सवरुन मोठे झालो.
एक्मेकांपासुन थोडे दूर झालो.
*
आज अचानक ,
त्यालाही सरकारी नोकरीच्या रांगेत पाहिला.
मित्र पुन्हा मिळणार म्हणुन आनंद वाटला.
पण
;
;
मला तिथुन खुलासा दिला गेला होता
खुल्यांसाठी म्हणे कोटाच नव्हता.
तरी खचलो नाही
आज तो सरकारी साहेब आहे.
मी मात्र सरकारी नोकर नाही.
*
*
*
आज माझ्या मुलाच्या वर्गातही
एक नवीन मुलगा आला.
मुलाने विचारले
’बाबा सगळे म्हणतात,
तो वेगळा आहे.
तो वेगळा आहे का?’
मी नकळत उत्तरलो
’तो तुला वेगळा दिसतो का?’
........................................

.......................

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top