तू येशील म्हणून मी वाट पाहतो आहे
तीही अशा कातरवेळी
उदाच्या नादलहरीसारख्या संधिप्रकाशात......
माझी सर्व कम्पने इवल्याश्या ओंजळीत जमा होतात
अशा वेळी वाटेकडे पाहणे,
सर्व आयुष्य पाठीशी बांधून एका सूक्ष्म लकेरीत तरंगत जाणे;
जसे अंधारातही ऐकू यावे दूरच्या नदीचे वाहणे.....
मी पाहतो झाडाकडे,पहाडाकडे...
तू येशील म्हणून पारावरती एक नसलेली पणती लावून देतो,
अणि आई नसलेल्या पोरासारखे माझे हे शहाणे डोळे
हलकेच सोडून देतो
नदीच्या प्रवाहात......
शुक्रवार, २९ मे, २००९
तू येशील म्हणून मी वाट पाहतो आहे
३:४०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा