Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

देता यावे हसू

Share

देता यावे हसू
निरभ्र अकलंकित
निरागस तान्ह्याच्या आनंदाइतके सहज कोवळे

देता यावे हात
निर्हेतूक आश्वासक
स्वत्:ला स्वत्:चा आधार देण्याइतके स्वाभाविक मोकळे

देता यावे शब्द
अम्लान नि:संशय
आयुष्याच्या पायाशी जगणारे निरहंकार

देता यावे हृदय
अपार निरामय
दयाघनाच्या दारापाशी पोचवणारे निराकार

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top