Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

तु परी, तु अप्सरा

Share

हसतेस तु अन आकाशी रंग उडती
मग त्या तुझ्या डोळ्यांतुनी
ढग फुलती ..
असतो तुझ्या हास्यातुनी
का शहारा ?
हसतेस तु अन भोवती
रान डुलती
तु परी, तु अप्सरा, की सखी तु ?
माझ्या मनी का अजुनी प्रश्न पडती ?
....
होते कधी तु सांज ती पावसाळी
अन तु कधी,
तुझ्यातुनी नाहणारी
मी फक्त तो दिवाणा तुझा,
प्रेमवेडा..
अन तु अशी राणी नभांची
ग तारका..
हसताच तु होते पहाट क्षितिजाशी
अन अंगणाशी का फुले झरती ?
तु परी, तु अप्सरा, की सखी तु ?
माझ्या मनी का अजुनी प्रश्न पडती ?

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top