कशी लाजली गं रात
संगे लाजल्या तारका
मिठी सख्याची पडता
कुजबुजल्या तारका ॥धृ॥
दिवे अंधाराचे बाई कसे पेटले गावात ?
निजभरलेल्या राती आज रंगलेली रात
मुका मोगरा कशाने आज झाला गं बोलका
मिठी सख्याची पडता कुजबुजल्या तारका ॥१॥
आज भिजली गं रात कशी जादु जादु झाली
नाही पाऊस तरीही धरा चिंब चिंबलेली
झाले बरसुन तरी "तो"ही बरसे सारखा
मिठी सख्याची पडता कुजबुजल्या तारका ॥२॥




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा