गावातल्या ढगांशी, पाऊस दाटलेला
स्पर्शात मी प्रियेच्या ..
मनमुग्ध चिंबलेला ..
हा खेळ चाललेला .. हा खेळ चाललेला !!
पाउस हा कधीचा
आहे तुझ्या किनारी
आणी तुझा किनारा
माझ्यात संपलेला ..
हा खेळ चाललेला .. हा खेळ चाललेला !! ॥१॥
आता कशास सखये ?
भिजते सुरात माझ्या
घेऊन पुर सारे
पाउस थांबलेला ..
हा खेळ चाललेला .. हा खेळ चाललेला !! ॥२॥
पाउस ठार वेडा
कुढतो उगा मनाशी
माझ्या मिठीत तुजला
पाहुन सांडलेला ..
हा खेळ चाललेला .. हा खेळ चाललेला !! ॥३॥
आता तुझा सुवास
घेतो भरुन गात्री
घेऊन जो सुवास ..
पाऊस गंधलेला ..
हा खेळ चाललेला .. हा खेळ चाललेला !! ॥४॥




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा