तीच तर कविता आहे ..
आतुन स्फुंदत येणारे काही भाव ..
जेव्हा अलगद कागदावर उमटतात ..
आणी मन हलक होऊन जात ..
जणु शब्दांच्या रुपाने ..
खुप जड झालेल अंर्तः मन, अचानक कापुर होऊन जात ..
तीच तर कविता आहे ..
कधी सोबत असलेल कुणी ..
कधी दुरावलेल कुणी ..
कधी कुणी डोळ्यांत साठलेलं ..
तर कधी कुणी अदृश्यतेच भरुन राहिलेल ..
जेव्हां स्पर्श न घडताही ..
रोमांच उठतो ना ..
तीच तर कविता आहे ..
कधी मायेच्या स्पर्शाची "आई" कविता
कधी सोडुन गेलेली "ताई" कविता
कधी डोळ्यात दाटलेली "सखी" कविता
कधी काहीच नाही म्हणुन अव्यक्त कविता
... जेव्हा नात्यांच्या विरहात आपलीस काही जाणवु लागत ..
आणी शब्दांच्या रुपात काव्य सुचत ना !!
तीच तर कविता आहे ..




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा