Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

नकोस कविते

Share

नकोस कविते आता स्मरु मज
नकोच नुसते रंग भरु
नकोस येउस आता अंगणी
नको फुलांचे गंध बनु ॥धॄ॥

नको नको ते शब्द मलाही
नकोच आता गीत बनु
निळ्या नभांगी नकोच चमकुस
नको वीजेचे तीर बनु ॥१॥

नकोस कविते आता स्मरु मज
नकोच नुसते रंग भरु ..

आता कोणते रिक्त बहाणे
तुझ्या भोवती उरलेले
नकोस कविते सुर बनु तु
नकोच आता ताल बनु ॥२॥

नकोस कविते आता स्मरु मज
नकोच नुसते रंग भरु ..

नकोच आता पुन्हा बहकणे
नकोच आता प्रीत पुन्हा
नकोच कविते पुन्हा वार तो
नकोस पुन्हा जखम बनु ॥३॥

नकोस कविते आता स्मरु मज
नकोच नुसते रंग भरु ..

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top