वरदानाचा शाप झाला
आणी अस्तित्वाचा साप..
हा तह एकेरीच झाला कदाचीत..
माझ्यात तु सदैव होतीस,
कदाचीत मीच नव्हतो तुझ्यात
श्वास असुन तु उरात कधी भरलंच नाहीस मला
जगत आलीस ते अवघे चार-दोन शब्द
काही श्लोक आणी कर्तव्यांचा अन्याय घेऊन
हा तह एकेरीच झाला कदाचीत..
मला भेटला विस्मॄतींचा घडा
आणी तु मात्र घेऊन गेलीस
आठवणींचा सारा समुद्र
माझ्या हातातला घडा अजुन रिताच आहे..
मी परमेश्वर नाही, आणी कर्णही
पण कुंचले मात्र तु काढुन घेतलीसच
आज कॄष्णानेदेखील तुलाच साथ दिली
मी समजत असुन हरलो आज..
हा तह एकेरीच झाला कदाचीत.




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा