Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २२ मे, २००९

थैक्स बाप्पा !

Share

थैक्स बाप्पा !
खुप दिवसात पाउस नाही
देवाने मजा केली…….
लक्ष्मीने क्षीरसागरातुन
एक घागर ओतुन दिली…!!
हवामानखाते फ़सले.. म्हणले,
हा नैरुत्य मौसमी पाउस…..
मनातल्या मनात देवी हसली
कैलासावर जाउन बसली..
पार्वतीने उंचावरुन…..
बर्फ़ाची पिंपे खाली ओतली….!!
हवामानखाते चक्रावले,
हा आग्नेय मौसमी पाउस की काय ?
शप्पथ सांगतो
आकाशात… देव मजा करत होता
आभाळातल्या नकाशात
कोवळा पाउस भरत होता….!!!!!!!!

थैक्स बाप्पा !

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top