…एक शापीत मेघ मी…
सार्या उदास वाटा कापीत चाललो मी,
होऊन मेघ काळा शापीत चाललो मी
झाले उन्हाळे अनेक, ओसाड उदास राने
ओल्या अधीर धारा कुरवाळीत चाललो मी
श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष
पानगळीत गुंतलेला श्वास शोधीत चाललो मी
झाले आप्त ही परके, उदास विराण घरटे
दाहक अंतरातला दूरावा तोडीत चाललो मी
पसरला गहिरा अंधार, झाकोळला आसमंत
दिशाहीन प्रवासात वाहवत चाललो मी
शुक्रवार, २२ मे, २००९
…एक शापीत मेघ मी…
१२:०७:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: आभाळ , कविता , पाऊस , मराठी कविता , शापीत , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: आभाळ , कविता , पाऊस , मराठी कविता , शापीत , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा