Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २२ मे, २००९

पाउस : तीन नजरांतुन

Share

पाउस : तीन नजरांतुन
टिपीकल सरकारी अधिकारी
( पाटबांधारे खाते )

पाउस मोठा आला
पैसा खोटा झाला
स्वप्नांना माझ्या
त्याचाच तोटा झाला !
आता काय करू
आता फ़ुलेल दाणापाणी
चला मेलो आता
आता माझी बिनपाणी !

शहरी माणुस:
चला आता वीज मिळेल
नेटसुध्दा लावता येइल
युएस् मधे सकाळ दुपार
मनोसोक्त बोलता येइल.
दैट्स ग्रेट !
पण रिडीक्युलस… पाउस…
थांबत का नाही..
पडतोय सारखा…….
माझे रिबोक् शूज्
आणि…… ओ माय गोड् !
इस् सो शैबी..!

शेतकरी…….
………………………………
……………………………….
…………………………………………….
………………………………
( शेतकरी दादा आता बोलण्यात वेळ नाही घालवणार……. तो गप काम करतोय, आपल्या सा-यांच्या स्वप्नांसाठी….
नाही म्हणजे, बांधावरच्या म्ससोबाला शेंदुर लावत असणार तो )

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top