एकदा तरी ….
एकदा तरी ….
एकदा तरी मला पावसासारखं जगायचंय
चारच महिने फक्त पण खूप खूप बरसायचंय ॥
अचानक येऊन मृद्गंध व्हायचंय
शिंपल्यात टपोरा मोती बनायचंय
पानावरून रिमझिम अलगद ओघळायचंय
शुभ्र धबधब्यात खळखळून वहायचंय ॥ १ ॥
रोज रोज कसलं काम ? कधी मनमानी करायचीये
मध्येच कधी सुट्टी घेऊन पुन्हा एकदा गर्जायचंय
माहेरवाशीण पोरीसारखं कधी क्षणभर थबकून जायचंय
निष्ठेने कधी तर रात्र - रात्र ओतायचंय ॥ २ ॥
आनंदासवे कधी भिववूनही टाकायचंय
रुणझुणताना कधी उग्रही बनायचंय
सृष्टीसह सार्या सूर्यालाही छळायचंय
तरीही वर पुन्हा ” लोभ असावा ” म्हणायचंय ॥ ३ ॥
मनसोक्त बरसल्यावर हलकेच निघायचंय
वेळ झाली समजताच ” गुड बाय ” म्हणायचंय ॥
एकदा तरी मला पावसासारखं जगायचंय
चारच महिने फक्त पण खूप खूप बरसायचंय ॥
शुक्रवार, २२ मे, २००९
एकदा तरी ….
१२:१०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा