वेलीस झाड बोले पाहून मोगऱ्याला
गंधीत सांज झाली सांगू नको कुणाला
होती मिठीत त्याच्या ती पाकळी अबोली
सारेच रान होते तेथेच सोहळ्याला
पाऊसही थबकला बघुनी मिठी तयांची
बरसून काय व्हावे ? भिजुदे असेच त्यांना ..
एकेदिशी परंतु, भलताच वार झाला
गंधीत मोगऱ्याच्या हाती गुलाब आला
वेलीस झाड बोले गेली कुठे अबोली ?
का मोगरा मनाशी पुरता गुलाब झाला ?
पाऊसही बरसला घेऊन मेघ सारे
गंधीत मोगऱ्याला भिजवुन हाय गेला
ना बोलली कुणाशी काहीच मग अबोली
अन मोगरा स्वतःशी, बोलून फार गेला




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा